स्वच्छता अभियान , शोभायात्रा काढुन बाबा जुमदेव यांच्या जन्मोत्सव उत्साहात साजरा


स्वच्छता अभियान, शोभायात्रा काढुन बाबा जुमदेव यांच्या जन्मोत्सव उत्साहात साजरा

कन्हान , कांद्री परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान : - पारशिवनी तालुक्यातील कन्हान आणि कांद्री येथे मानवधर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेव यांच्या १०३ वा जन्मोत्सव विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला .

बाबा हनुमानजी सेवक संस्था कन्हान – पिपरी

बाबा हनुमानजी सेवक संस्था कन्हान – पिपरी द्वारे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या १०३ व्या जन्मोत्सव निमित्य दोन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . बुधवार (दि.३) एप्रिल ला बाबा जुमदेव यांचा जयंती च्या दिवशी बाबा हनुमानजी सेवक संस्था कार्यालय येथे कार्यक्रमाचे उद्घाटक सौ.लता बुराडे , कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.य.म.ढबाले गुरुजी , प्रमुख अतिथि नरेश सव्वालाखे , मोरेश्वर सार्वे , कंठीरामजी पडारे , राजु पिल्हारे सह आदि मान्यवरांचा हस्ते महानत्यागी बाबा जुमदेव यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन अभिवादन करीत बाबा जुमदेव ग्राम स्वच्छता अभियान कार्यक्रमाने महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला . 



बाबा हनुमानजी सेवक संस्था कार्यालय पटेल नगर ते गांधी चौक  आणि प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले . दुसऱ्या दिवशी गुरुवार (दि.४) एप्रिल ला संस्था कार्यालय येथे बाबा जुमदेव यांचा प्रतिमेचे पुजन करुन सामुहिक हवन करण्यात आले . त्यानंतर संस्था कार्यालय पटेल नगर येथुन बाबा जुमदेव यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली . ही शोभायात्रा राष्ट्रीय महामार्गा ने गांधी चौक , डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक , तारसा चौक , सात नंबर नाका होऊन परत तारसा चौक , आंंबेडकर चौक , अशोक नगर , धरम नगर , दुर्गा मंदिर चौक पिपरी होत शोभायात्रे चे संस्था कार्यालय पटेल नगर येथे समापन करण्यात आले . यावेळी ठिकठिकाणी शोभायात्रे चे नागरिकांनी फुलाच्या वर्षाने , फळ , नमकीन , शरबत वितरण करुन जोरदार स्वागत केले . 

त्यानंतर महानत्यागी बाबा जुमदेवजींचे व मान्यवरांचे स्वागत , भगवत कार्याची चर्चा बैठक , शेवटी भोजन ग्रहण करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली  . या प्रसंगी नथुजी कोहाड , एकनाथ जिभकाटे , गुरुदास शेंडे , राजु माटे , रविकुमार मरसकोल्हे , सरस्वताबाई माटे , रघुजी पिल्लारे , नरेश ईश्वरकर , उमेश भोंगाडे , गोपाल धार्मिक , मुलचंद जुमळे , पुरुषोत्तम बावनकर , मदनलाल कनोजे , रामभाऊ सावरकर , मधुकर वैद्य , लक्ष्मण डहारे , प्रकाश निंबार्ते , राजु भोयर , बंडु पिसे , कृष्णाजी रहाटे , जयपालजी पटेल , विजय सरोदे , लता बुरडे , मनिषा ठवकर , कश्यप बाई , मनिषा धुले , स्वाती देशमुख , गिता गोंडाने , लक्ष्मी गोंडाणे , रमा सहारे , शितल फूले , रजनी परते , आशा साखरकर , सरिता भोयर , मनिषा राऊत , बेबी वरणकर , रुपाली राहाटे , मिना गोंडाणे , भावना धुर्वे , ज्योती बंड , सत्यफुला सावरकर , सुशिला टोहणे , गया वानखेडे , दया मेश्राम , छाया केवट , प्रतिभा भोयर , सीमा भोयर , वनमाला ठाकरे , लक्ष्मी देशमुख , सुषमा गोंडाणे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता बाबा हनुमानजी सेवक संस्था कन्हान-पिपरी चे अध्यक्ष गोपीचंद सावरकर , उपाध्यक्ष संजय बैस , कार्याध्यक्ष सौ.चंद्रकला देशमुख , कोषाध्यक्ष दिनेश देशमुख , सहसचिव मानिकजी पोटे , शांतानु राऊत , प्रमोद घुले , सागर फुले , मोरेश्वर भोयर , श्यामकुमार बर्वे  , गजानन राहाटे , नरेश पाल , अरविंद केवट , नितीन चानेकर , राजु मारबते , अरविंद वरणकर , कविता सहारे , गिता सहारे सह आदि सेवक , सेविकांनी सहकार्य केले .

कांद्री येथे प्रभात फेरी काढुन बाबा जुमदेव यांच्या जन्मोत्सव उत्साहात साजरा

परमात्मा एक सेवक मंडळ , कांद्री द्वारे मानवधर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेव यांच्या जन्मोत्सव निमित्य दोन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . मंगलवार (दि.२) एप्रिल ला परमात्मा एक सेवक संस्था मानव मंदिर येथे हवन कार्य करुन महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला . बुधवार (दि.३) एप्रिल ला बाबा जुमदेव यांच्या जयंती च्या दिवशी परमात्मा एक सेवक संस्था मानव मंदिर येथे बाबा जुमदेव , बाबा हनुमानजी यांचा प्रतिमेला संस्थेचे कार्याध्यक्ष रामभाऊजी सावरकर यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करुन अभिवादन करीत प्रभात फेरी काढण्यात आली . 

ही प्रभात फेरी संपुर्ण कांद्री परिसर भ्रमण करुन फेरीचे मानव मंदिर येथे समापन करण्यात आले . त्यानंतर स्वागत समारंभ , चर्चा बैठक , मानव धर्मावर आधारित शाहिर गंगाधरजी धोत्रे यांचा कला पथक कार्यक्रम आणि शेवटी महाप्रसाद वितरण करुन महोत्सवाची सांगता करण्यात आली . या प्रसंगी सेवक , सेविका , बालगोपाल सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या