पत्नी आणि स्वता:चा अंगावर पेट्रोल टाकुन जाळले , उपचारा दरम्यान पतीचा मृत्यु


पत्नी आणि स्वता:चा अंगावर पेट्रोल टाकुन जाळले , उपचारा दरम्यान पतीचा मृत्यु


पत्नी गंभीर जख्मी , पोलीसात गुन्हा दाखल 


कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड शिवनगर येथील जुनघरे यांचा घरी भाड्याने राहत असलेल्या पत्नी ने पति ला सोबत जाण्यास नकार दिल्याने मद्यधुंद पतीने पत्नी आणि स्वता चा अंगावर पेट्रोल टाकुन जाळले,यात दोघे ही गंभीर जख्मी भाजल्याने उपचारा दरम्यान पतीचा मृत्यु झाला . ही घटना शुक्रवार (दि.२९) मार्च ला रात्री ७:३० वाजता च्या सुमारास घडली . मृतक आरोपी पती राहुल चिंतामण चाफले (वय ३३)रा.शिवाजी नगर आणि आकांक्षा राहुल चाफले (वय २९) असे जख्मी पत्नीचे नाव आहे .


पोलीसांन कडुन मिळालेल्या माहिती नुसार आरोपी राहुल चाफले याला दारूचे व्यसन असल्याने व चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी पत्नीला मारहाण करत असल्याने त्याची पत्नी आकांक्षा आपल्या दहा वर्षाची मुलगी आणि सहा वर्षाच्या मुलासह कन्हान येथील तारसा रोडवर भाड्याच्या घरात राहत होती . 

दहा वर्षाची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा असल्याने मोलकरणीचे काम करून ती मुलांचे संगोपन करत होती . शुक्रवार (दि.२९) मार्च ला रात्री ७:३० वाजता च्या दरम्यान राहुल बाॅटल मध्ये पेट्रोल घेऊन पत्नीच्या भाड्याच्या घरात पोहोचला . पत्नीला घरी चल नाही तर तुला पेट्रोल टाकुन जाळीन असे म्हणून राहुल ने पत्नी आकांक्षा सोबत हातापाई केली . 

आकांक्षा ने पती ला सोबत जाण्यास नकार दिल्याने त्याने आधी स्वता:चा अंगावर पेट्रोल टाकले आणि नंतर आकांक्षाचा अंगावर ही पेट्रोल टाकले . दोन्ही मुले घरात असल्याने आकांक्षा घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतांना राहुल ने आकांक्षाला घट्ट पकडून लायटरने पेटवून दिले . 



आगीत लहान मुले भाजल्याने व आकांक्षाने आवाज केल्याने घरमालक व शेजारील लोकांनी धाव घेत कशीतरी आग विझवली .मात्र तोपर्यंत दोघे ही आगीत भस्मसात झाले होते . सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक उमेश पाटील स्टाॅपसह घटनास्थळी पोहचले आणि दोघांनाही तातडीने नागपूर येथील वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले . 

शनिवार ला पहाटे चार वाजता च्या दरम्यान राहुल चा उपचारा दरम्यान मृत्यू झाला . सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी आकांक्षा चाफले यांचा तक्रारी वरून आरोपी पती राहुल चाफले याच्या विरुद्ध ३०७ चा गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पराग फुलझले हे करीत आहे .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या