बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांचा विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी


बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांचा विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी


मानव धर्माच्या सेवकांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन 


कन्हान : - बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री महाराज यांनी मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या भक्ती, कार्याबद्दल व अनुयायी (सेवक) यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिपणी व प्रवचनाच्या माध्यमातून अपप्रचार करीत असुन मानव धर्माच्या सेवकांच्या धार्मिक भावनेला ठेस पोहचविण्याचे कार्य करीत असल्याने मानव धर्माच्या सेवकांनी दिनेश देशमुख यांचा नेतृत्वात पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना निवेदन देऊन तात्काळ धीरज शास्त्री यांचा विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे .


निवेदन पत्रात सांगितले कि मोहाडी नगर येथे धिरेंद्र शास्त्री यांचा गुरुवार (दि २८) मार्च पासुन चंदू बाबा स्टेडियम येथे धर्मीक प्रवचनाचा कार्यक्रम सुरू असुन शुक्रवार (दि.२९) मार्च ला आपल्या धार्मिक प्रवचनाच्या माध्यमातून आपल्या अनुयायी यांना मार्गदर्शन करीत असतांना मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे विचार व कर्याबद्दल विवादित टिपनी करून सर्व सेवकांच्या धार्मिक भावनेला ठेस पोहचवली आहे.धिरेंद्र शास्त्री यांनी प्रवचनाच्या माध्यमातून महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा उल्लेख करत "जे राम करीत नाही त्यांचे पूर्वज तर नरकात आहेतच पण तुम्ही व येणारी पिढी नरकात जाईल" अशा आशयाचे टिपनी करत सेवकांच्या धार्मिक भावनेला ठेस पोहचविण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर "परमात्मा एक मार्गात आई वडिलांना मानत नाही तो हनुमान भक्त होवू शकत नाही, असे बोलत मानव धर्माचा अपप्रचार केला . महानत्यागी बाबा जुमदेव यांनी मानवधर्म, परमात्मा एक मार्गाच्या माध्यमातुन सदैव परिवर्तनाचा विचार हा दिलेला आहे व समाजाला व्यसनमुक्त व अंधश्रध्दामुक्त करण्याचे कार्य केले आहेत.मानव धर्मातील सेवक हे परिवर्तनवादी व विज्ञानवादी विचाराचा आहेत. संतांनी जे विचार सांगितले आहेत ते मानव धर्मात मानले जातात. धर्म आणि भक्ती च्या नावाखाली समाजामध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या कार्यावर आक्षेपार्ह टिपनी करुन मानव धर्माच्या सेवकांच्या धार्मिक भावनेला ठेस पोहचविल्याने मानव धर्माच्या सेवकांनी दिनेश देशमुख यांचा नेतृत्वात पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना निवेदन देऊन तात्काळ धीरज शास्त्री यांचा विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे . अन्यथा उग्र आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे .


या प्रसंगी संजय भैस , मोरेश्वर भोयर , अनिल केवट , गजानन राहाटे , अरविंद वरणकर , धीरज देवांगन , प्रमोद धुले , मंगेश भोयर , पंजाब भोयर , विजम गोंडाने , सागर फुले , रोहित सहारे , शांतानु राऊत , श्यामुजी सहारे , रोहित हावरे , अतुल मानकर , शिवनाश खंडाते , नितिन चनेकर , श्यामजी पुंड , अनिकेत पुंड , विनोद धुले , संजय भोयर , उद्यजी बोरकर , रमेश हावरे , शालीकराम साखरकर , नारायण भोयर , सुरेश केवट , शिवजी गोंडाणे , केपीजी भैस , अशोक ठाकरे , सुरेंद्र चौरे , स्वाती देशमुख , वनमाला ठाकरे ,  गीता सहारे , रमा सहारे , कपीता हावरे , मनिषा धुले , मिना गोंडाणे , बेबी वरणकर , मनिषा राऊत , आशा साखरकर , रामस्वारी कश्यप , लक्ष्मी गोंडाणे , सरिता भोयर सह आदि सेवक मोठ्या संख्येत उपस्थित होते .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या