पारशिवनी मधील पेंच नदीवरील पूल! शासन दुर्लक्ष मुळे जिर्ण अवस्थेत


पारशिवनी मधील पेंच नदीवरील पूल! शासन दुर्लक्ष मुळे जिर्ण अवस्थेत

पेंच नदीवरील पुलाचे नवीन बांधकाम करणे आवश्यक आहे. त्या कडे शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. परिणामी पुलाची अवस्था जीर्ण झाली आहे.

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील पेंच नदीवरील पुल हा जिरन झालेला असुन या कडे शासनाने ताबडतोब लक्ष देणे आवश्यक असल्यामुळे पुला वरती नेहमी जीव घेणे खड्डे पडल्यामुळे येथुन येणार जाणारया लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागतो.

        एवढेंच नाही तर कोरोना मध्ये २०२१ आलेल्या पुरामध्ये हा पुल पुर्ण उखडला होता. पूर आल्यानी पाणी पुलाच्या वरून वाहत होते, पण एवढे चांगले झाले की पुल तुटला नाही. पुल तुटला असता तर सम्पर्क तुटले असतें तर पारशिवनी किंवा सावनेर ला जायचे असल्यास कामठी, खापरखेडा ह्या मार्गाने जावे लागले असते. पारशिवनी वासियांना नशिब चांगले असल्या मुळे पुल पुर्ण उखडले असले तरी त्यांची रिपेरिग करुन तो आता पर्यन्त चालु आहे.

     .  पण हया पुलीयाचे अस्तित्व आजही धोक्या असल्यामुळे या क्षेत्राचे खासदार आणि आमदार यांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच आमदार आशिष जैस्वाल आणि रामटेक क्षेत्राचे खासदार कुपाल तुमाने यांनी ताबडतोब लक्ष दिले असते तर परिस्थितीत सुधार झाला असता. आवश्यक तसेच बांधकाम विभागानेही तातडीने सर्वे करुन पेंच नदीवरील पुलाचे काम चालू करणे आवश्यक आहे.

 

प्रतिनिधी: सतीश साकोरे, पारशिवनी

प्रतिनिधीनिर्मला मरकाम 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या