वेकोलिच्या ब्लास्टिंगमुळे दोन घराचे स्लॅब कोसळले , मोठा अनर्थ टळला


वेकोलिच्या ब्लास्टिंगमुळे दोन घराचे स्लॅब कोसळले , मोठा अनर्थ टळला

जुनी कामठी येथील घटना , नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण

वेकोलि प्रशासनाने ब्लास्टिंगची तीव्रता तात्काळ कमी करावी नागरिकांची मागणी

कन्हान : - वेकोलिच्या अतितीव्रतेच्या ब्लास्टिंगमुळे  जुनी कामठी येथे दोन घरांचे स्लॅब कोसळल्याने नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .कोळश्याचे उत्पादन वाढविण्यासाठी वेकोलीच्या खुल्या खाणींमध्ये बारूद ने ब्लास्टिंग केली केली जाते . ब्लास्टिंग ची तीव्रता जास्त असल्याने त्याच्या कंपनांमुळे मंगळवार (दि.२६) मार्च ला दुपारी २:३० च्या दरम्यान जुनी कामठी येथील रहिवासी भाऊराव मारबते आणि राजेंद्र खंडाते यांच्या घरांचे स्लॅब कोसळले . सुदैवाने घरातील लोक बाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला .


मागील कित्येक वर्षापासुन वेकोलिच्या गोंडेगाव आणि कामठी ओसीएम मध्ये कोळ्याचे उत्पादन वाढविण्यासाठी दररोज बारूद ने ब्लास्टिंग केली जाते . ब्लाॅस्टींग ची तीव्रता जास्त असल्याने त्याच्या कंपनांमुळे कन्हान , पिपरी , कांद्री , टेकाडी , घाटरोहणा , जुनी कामठी , गोंडेगाव , खदान सह आजू बाजूच्या वस्त्यांमधील घरांचा भींती क्रॅक झाले असुन अनेक घर कोसळण्याचा मार्गावर पोहोचले आहेत . सतत होत असलेल्या ब्लास्टिंगमुळे कधी ही मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही . ब्लाॅस्टिंग ची तीव्रता कमी करण्यासाठी डब्ल्यूसीएल व्यवस्थापनाला अनेक वेळा निवेदन पत्र देण्यात आले . मात्र अधिकारी सदर विषयाला गांभीर्याने घेत नसुन स्थानिक आमदार , खासदार जनप्रतिनिधी सुद्धा या कडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत असल्याने वेकोलि प्रशासनाने ब्लास्टिंग ची तीव्रता कमी करावी अशी मागणी नागरिकांच्या चर्चेतुन समोर येत आहे .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या