कन्हान ते शिर्डी साई पालखी पदयात्रेचे प्रस्थान


कन्हान ते शिर्डी साई पालखी पदयात्रेचे प्रस्थान


ठिकठिकाणी पालखी पदयात्रेचे फुलाच्या वर्षाने जल्लोषात स्वागत 


श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हान व्दारे आयोजन 


कन्हान : - श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हान व्दारे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा रामनवमी उत्सवा निमित्य कन्हान ते शिर्डी पालखी व पदयात्रेचे आयोजन करण्यात आले . काल बुधवार (दि.२७) मार्च ला सकाळी ११ वाजता श्री साई मंदीर इंदिरा नगर , कन्हान येथे सर्व साई भक्तांनी विधिवत पुजा अर्चना , महाआरती आणि परिसरात प्रसाद वाटप करुन भव्य मिरवणुक काढण्यात आली . 

ही पालखी पदयात्रा परिसरातील विविध मार्गाने भ्रमण करुन तारसा रोड मार्गाने नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वर आली असता आंंबेडकर चौक , गांधी चौक येथे साई भक्तांनी पालखी पदयात्रेचे फुलाच्या वर्षाने , फळ , पानी बोटल , शरबत वितरण करुन जोरदार स्वागत केले . शैकडो साई भक्तांनी पालखी पदयात्रेत सहभाग घेतला . भाविकांनी साई मंदीर आडापुल,कामठी येथे साई चे दर्शन घेतले . 

कामठी मार्गे श्री साई कृपा संस्थान नागार्जुन कॉलोनी जरीपटका रिंग रोड नागपुर येथे सायंकाळी पोहचुन नरेंद्र हेमराजानी तर्फे पदयात्रे करूची जेवणाची व मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली . आज दुस-या दिवशी गुरूवार (दि.२८) मार्च ला सकाळी ७ वाजता शंभर साई भक्त पालखी पदयात्रेत सहभागी होऊन कळमेश्वर मार्गे पुढे मार्गक्रम करतील. अशा प्रकारे दरवर्षी प्रमाणे सतत २२ दिवस हा पालखी व पदयात्रा सोहळा थाटात साजरा करण्यात येत असतो .

पालखीची दिनचर्या : –

सकाळी ५.३० वा.काकड आरती , सकाळी ६.३० वा. मंगलस्नान व अभिषेक, दुपारी १२ वाजता मध्यान्ह आरती / नैवेद्य , दुपारी ४.३० वा. साई गुरुपाठ अभंग , सायंकाळी ६.४५ वा.धुप आरती / नैवेद्य, रात्री १०.३० वा. शेजारती. मंगळवार (दि.९) एप्रिल ला गुडी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर साई सच्चरित्र साप्ताहिक पारायण श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हान व्दारे करण्यात येईल .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या