छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी


छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी


कन्हान  : - शिवाजी स्मारक समिति आणि शिवाजी नगर मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी प्रमाणे ३९४ वी जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले , कन्हान - पिपरी नगर परिषद नगराध्यक्षा करुणा आष्टणकर , माजी नगरसेवक अनिल ठाकरे सह आदि मान्यवरांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन आणि "छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो , जय भवानी जय शिवाजी" असा जयघोष करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी जेष्ठ नागरिक भरत सावळे , महिला शहर प्रमुख मनिषा चिखले , लता लुंढेरे सह आदि मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सर्व नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती उत्साहात थाटात साजरी करण्यात आली .


या प्रसंगी ज्योती येवले , वैशाली श्रीखंडे , जेष्ठ नागरिक मुलचंद शिंदेकर , रविंद्र राणे , अजय चव्हाण , प्रदीप गायकवाड , हरिष तिडके , सचिन सहारे , अश्विन बांते , प्रफुल वैद्य , चिंटु वाकुडकर , प्रशांत मसार , रविसींग सोलंकी , रेवाजी गाथे , रामचंद्र गायकवाड , साहेबराव खेरडे , अशोक गायकवाड , प्रवीण तिवारी , तनकुवर राणे , मनोज मिश्रा , घनश्याम गराडे , जयराम तिडके , शुभम येलमुले , चेतन खेरडे , निलेश चौरे , रंजित शिंदेकर , शुभम कांलबाडे , रवि पाहुणे , दिनेश देशमुख , पुणेरती वांडेकर सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या