कांद्री मधील गोळीबार प्रकरणात एक आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल , आरोपी अटक


कांद्री मधील गोळीबार प्रकरणात एक आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल , आरोपी अटक

दोन पिस्तुल जप्त , १ एप्रिल पर्यंत पीसीआर


कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री वार्ड क्रमांक ४ येथे उधारी पैशाचा वादातुन झालेल्या गोळीबार प्रकरणात कन्हान पोलीसांनी एका आरोपी ला अटक करुन त्याचा जवळुन दोन पिस्तुल जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे .


पोलीसांन कडुन मिळालेल्या माहिती नुसार गुरवार (दि.२८) मार्च ला सकाळी ९:३० वाजता च्या दरम्यान अंकुश शांतालाल केसरवाणी (वय ४०) रा.कांद्री हा आपल्या मोठा भाऊ नितिन केसरवानी यांचा सोबत आरोपी सुनील मधुसुधन तिवारी (वय ३५) रा.यांचा घरी उधारी चे पैसे मागायला गेला होता . आरोपी सुनिल तिवारी ला केसरवानी बंधु यांनी उधारीचे पैसे मागितले असता यांच्यात वाद झाला . राग मनात धरुन सुनिल ने घरात ठेवलेले पिस्तुल ने अंकुश च्या दिशेने आणि जीवे मारण्याचा उद्देशाने गोळी झाडली असता सुनिल ची आई शोभा तिवारी मधात आल्याने तिचा छातीला व डाव्या हाताला गोळी लागुन गंभीर जख्मी झाली . सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी अंकुश केसरवानी यांचा तक्रारी वरून आरोपी सुनिल तिवारी यांचा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे  . पोलीसांनी सुनिल जवळुन दोन पिस्तुल जप्त करुन शुक्रवार ला कामठी कोर्टात पेश केले असता कोर्टाने सुनिल ला १ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . घटनेचा पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहे .


सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार , अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ , उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड , यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस निरिक्षक उमेश पाटील , सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हान , पराग फुलझले , निखिल मिश्रा , अमोल नागरे , हरिष सोनभद्रे , सचिन वेळेकर सह आदि पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या