कांद्री येथे पैशाचा वादातुन गोळीबार , महिला गंभीर जख्मी


कांद्री येथे पैशाचा वादातुन गोळीबार , महिला गंभीर जख्मी 


आरोपी अटक , पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार घटनास्थळी दाखल , 


कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री वार्ड क्रमांक ४ येथे पैशाचा वादातुन गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळखळ उडाली आहे .



प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज गुरूवार दिनांक २८ मार्च ला सकाळी ९:३० वाजता च्या दरम्यान नितीन केसरवानी आणि अंकुश केसरवाणी हे सुनील तिवारी यांच्या घरी एक लाख रुपयांची जुनी रक्कम मागायला गेले असता सुनील तिवारी आणि केसरवाणी बंधु यांच्यात वाद झाला . वाद इतका विकोपात गेला कि सुनील तिवारी घरात गेला आणि घरात ठेवलेले पिस्तोल आणून केसरवाणी बंधूंकडे दाखवले . वाद वाढता पाहुण सुनिल तिवारी यांची आई शोभा तिवारी हे वाद सोडायला गेली असता त्यांच्यावर गोळीबार झाला आणि आरोपी सुनील तिवारी तेथुन पळुन गेला .


सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक उमेश पाटील , सहायक पोलीस निरीक्षक पराग फुलझले , राहुल चव्हान , निखिल मिश्रा यांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन जख्मी महिलेला उपचारा करिता नागपुर येथे खाजगी रुग्णालयात भर्ती करण्यात आले . सदर घटना गांभीर्याने घेत नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार , अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ , उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली . कन्हान पोलीसांनी आरोपी सुनिल तिवारी यास ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या