अवैधरित्या धारदार शस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल


अवैधरित्या धारदार शस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

एक अटक , एक फरार , पोलीसात गुन्हा दाखल

कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत गोंडेगाव काॅलरी मध्ये अवैधरित्या धारदार शस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .एका आरोपी ला अटक करण्यात आली असुन दुसऱ्या आरोपीचा शोध कन्हान पोलीस करत आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार (दि.२५) मार्च ला सायंकाळी ५:०० वाजता च्या दरम्यान कन्हान पोलीस धुलिवंदन बंदोबस्त पेट्रोलिंग करित असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली की गोंडेगाव कॉलनी मध्ये दोन इसम दुचाकी वाहनाने येत असुन त्यांनी हातात धारदार तलवार बाळगली आहे व नागरिकां मध्ये दहशत निर्माण केली आहे . 

अशा मिळालेल्या माहिती वरून कन्हान पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचली असता पोलीस आल्याची चाहुल लागताच मागे बसलेला इसम फरार अमन प्रेमदास पहाडे रा.जुने गोंडेगाव कन्हान हा हातातील तलवार खाली फेकुन पळून गेला व दुचाकी वाहन चालविणारा आरोपी नामे अमित नागोराव गजभिये रा.गोंडेगाव कॉलरी कन्हान यास ताब्यात घेतले . 

कन्हान पोलीसांनी घटनास्थळा वरुन एक धारदार तलवार पुर्ण पणे लांबी ३ फुट ३ इंच,पितळी मुठ त्यावर अर्धचंद्रकार कोर असलेली लांबी ९ इंच स्टिलचे धारदार पाते २ फुट ६ इंच,पात्याची रूंदी ३ इंच किंमत १००० रू. व एक दुचाकी जुनी वापरती बजाज कंपनीची डिस्कव्हर मॉडेल असलेली दुचाकी वाहन क्रमांक डीजे - एम एच ४० एस ७२२० किंमत१५००० रू.असा एकुण १६००० रूपयाचा माल जप्त केला . 

सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी सरकार तर्फे फिर्यादी महेश बिसेन यांचा तक्रारी वरून पोस्टे ला दोन्ही आरोपी विरुद्ध कलम ४,२५ शस्त्र अधिनियम १९५९ महाराष्ट्र पोलिस अधिनियम.१९५१ कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात महेश बिसेन  , सचिन वेळेकर हे करीत आहे . 

सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीण कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हान , महेश बिसेन , अमोल नागरे , सचिन वेळेकर , सम्राट वनपर्ती , वैभव बोरपल्ले सह आदिंनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या