पिपरी-कन्हानमध्ये ६८ वा भव्य नवरात्रोत्सव २०२६: कावड-कलश यात्रेने होणार आदिशक्तीचे आगमन
पिपरी-कन्हानमध्ये ६८ वा भव्य नवरात्रोत्सव!
कावड-कलश यात्रेने होणार आदिशक्तीचे आगमन; अखंड मनोकामना ज्योतीसह विविध भक्तीमय कार्यक्रमांचे आयोजन
कन्हान : - पिपरी-कन्हान येथील दुर्गामाता मंदिर चौकात सार्वजनिक श्री नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने यंदा ६८ व्या वर्षी भव्य नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ११ ऑक्टोबर ते मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आदिशक्तीच्या उपासनेसह विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि भक्तीमय कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
नवरात्रोत्सवाची सुरुवात रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कन्हान नदीच्या पात्रातून पवित्र गंगाजल आणून करण्यात येणार आहे. यावेळी भव्य कावड व कलश यात्रा काढण्यात येणार असून बग्गी, घोडे, बँड, नवदुर्गेच्या नऊ रूपांचे सादरीकरण, शिवतांडव नृत्य तसेच भजन मंडळाचा सहभाग यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. ही भक्तिमय आस्था संगम रॅली नगरभ्रमण करत श्री नवदुर्गा माता मंदिरात पोहोचणार आहे.
मंदिरात पवित्र गंगाजल व पंचामृताने श्री नवदुर्गा मातेचा अभिषेक, कलश जलाभिषेक, मंत्रोच्चार, पूजन व विधिवत घटस्थापना करण्यात येणार आहे. यासोबतच मंडळाच्या प्राचीन परंपरेनुसार अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित करण्यात येणार असून नवरात्रोत्सवाच्या नऊही दिवसांत भाविकांना या पवित्र ज्योतीचे दर्शन घेता येणार आहे.
भक्तीमय कार्यक्रमांची पर्वणी
नवरात्रोत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि.१२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य-दिव्य महाकाली देवी जसजागरण होणार आहे.
बुधवार, दि.१४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता श्री नवदुर्गा आईचा गोंधळ आयोजित करण्यात आला आहे. तर रविवार, दि.१८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता अष्टमी महायज्ञ व हवनकुंड पूजन संपन्न होणार आहे. सोमवार, दि.१९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाची सांगता मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता घटविसर्जनाने होणार असून त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता रावणदहन व अखंड मनोकामना ज्योत विसर्जन करण्यात येणार आहे.
नवरात्रोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत दररोज सकाळी ८ वाजता व सायंकाळी ७ वाजता महाआरती आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे पिपरी-कन्हान परिसरात नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांत भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण होणार आहे.
भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे सार्वजनिक श्री नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी-कन्हान, समस्त गावकरी नागरिक तसेच महिला मंडळाच्या वतीने सर्व धर्मप्रेमी भाविकांना या भक्तीमय नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आदिशक्ती श्री नवदुर्गा मातेच्या दर्शनाचा व विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेऊन पुण्याचा भागीदार व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पिपरी-कन्हान नगरीत ‘जय माता दी’चा जयघोष, भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळणार आहे.
प्रमुख कार्यक्रम व सोहळे
कलश व कावड यात्रा: रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कन्हान नदीच्या पात्रातून पवित्र गंगाजल आणून यात्रा काढली जाईल. यात बग्गी, घोडे, बँड, शिवतांडव नृत्य आणि नवदुर्गेच्या नऊ रूपांचे सादरीकरण मुख्य आकर्षण असेल.
घटस्थापना व अखंड ज्योत: मंदिरात विधिवत घटस्थापना आणि प्राचीन परंपरेनुसार अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित केली जाईल.
धार्मिक कार्यक्रम: १२ ऑक्टोबरला महाकाली देवी जसजागरण, १४ ऑक्टोबरला गोंधळ, १८ ऑक्टोबरला अष्टमी महायज्ञ, १९ ऑक्टोबरला महाप्रसाद आणि २० ऑक्टोबर रोजी सकाळी घटविसर्जन तर सायंकाळी रावणदहन व ज्योत विसर्जन होणार आहे.
दैनिक आरती: संपूर्ण नवरात्रात दररोज सकाळी ८ आणि सायंकाळी ७ वाजता महाआरती होईल.
पिपरी-कन्हान येथील दुर्गामाता मंदिर चौकात ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२६ दरम्यान ६८ वा भव्य नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होत आहे. सार्वजनिक श्री नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित या महोत्सवाचा शुभारंभ ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता भव्य कावड व कलश यात्रेने होईल. कन्हान नदीवरून आणल्या जाणाऱ्या पवित्र गंगाजल कलशाची ही यात्रा नगरभ्रमण करत मंदिरात पोहचेल, जिथे विधिवत घटस्थापना व अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित केली जाईल.
या १० दिवसांच्या उत्सवात महाकाली जसजागरण, देवीचा गोंधळ, अष्टमी महायज्ञ, हवन, भव्य महाप्रसाद आणि रावणदहनासारखे अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. दररोज सकाळी आणि सायंकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. पिपरी-कन्हान नगरीत 'जय माता दी'च्या जयघोषात आध्यात्मिक वातावरण अनुभवण्यासाठी सर्व धर्मप्रेमी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आदिशक्ती श्री नवदुर्गा मातेच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सह संपादक - ऋषभ बावनकर


Responsive Advertisement
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time