कन्हानमध्ये कावड-कलश यात्रेचे जल्लोषात स्वागत


कन्हानमध्ये कावड-कलश यात्रेचे जल्लोषात स्वागत


गौ सेवा समिती आणि सनातनी धार्मिक संस्थेच्या वतीने फुलांची उधळण, फळे व पाणी वाटप करून भाविकांचे स्वागत


कन्हान : - पिपरी-कन्हान परिसरातील प्राचीन दुर्गामाता मंदिर येथील सार्वजनिक श्री नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने घटस्थापनेच्या दिवशी आयोजित भव्य कावड-कलश यात्रेचे कन्हान येथे गौ सेवा समिती आणि सनातनी धार्मिक संस्था, कन्हान क्षेत्र यांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.


कन्हान नदीपात्रात विधिवत पूजा-अर्चना करून पवित्र जल कलशांमध्ये भरल्यानंतर या भव्य यात्रेला सुरुवात झाली. यात्रेत कलशधारी महिला व कन्या, कावडधारी पुरुष, नवदुर्गेच्या नऊ रूपांचे सादरीकरण, आकर्षक बग्गी, घोडे, बँड-बाजा आणि भजन मंडळांचा सहभाग होता. जय माता दीच्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ही यात्रा बीकेसीपी शाळा परिसरातुन निघुन जुने कन्हान पोलीस स्टेशन परिसरातील शिव पंचायत हनुमान मंदिर, गांधी चौक येथे पोहोचताच गौ सेवा समिती, कन्हान आणि सनातनी धार्मिक संस्था, कन्हान क्षेत्र यांच्या वतीने भाविकांचे फुलांची उधळण करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी यात्रेतील भाविकांना फळे व पाण्याचे वितरण करण्यात आले.


या प्रसंगी गौ सेवा समितीचे कन्हान शहर प्रमुख व सनातनी धार्मिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शुभम बावनकर, ज्येष्ठ नागरिक भरत सावळे, नारायण गजभिये, ज्ञानेश्वर दारोडे, कैप्टन सतीश बेलसरे,वेदांत बावनकुळे, आयुष संतापे,अमन यादव, सुजल यादव,निखिल मेश्राम, समाजसेविका रंजना किरपाने, श्री हनुमान शिव पंचायत मंदिर पंचकमेटी,यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.


सह संपादक - ऋषभ बावनकर


















































कावड कलश यात्रा कन्हान
Kanhan Kawad Kalash Yatra,
सार्वजनिक श्री नवदुर्गा उत्सव मंडळ कन्हान,
गौ सेवा समिती कन्हान,
सनातनी धार्मिक संस्था कन्हान,
पिपरी कन्हान दुर्गामाता मंदिर यात्रा,
कन्हान न्यूज आजची बातमी,
Kanhan News Update,
Navdurga Utsav Kanhan 2026,
Shubham Bawankar Kanhan,
Pudhakar Samachar Kanhan,


#KanhanNews #KawadYatra #NavdurgaUtsav #GouSewaSamiti #SanataniDharmikSanstha #PiphriKanhan #LocalNewsMaharashtra #PudhakarSamachar

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या