ग्रीन जिम परिसरात ज्येष्ठ नागरिकांची स्वच्छता मोहीम


ग्रीन जिम परिसरात ज्येष्ठ नागरिकांची स्वच्छता मोहीम


ज्येष्ठ नागरिक संघ, जागृती ज्येष्ठ नागरिक संघटना व नगरपरिषदेचा संयुक्त पुढाकार; ग्रीन जिमच्या दुरुस्तीचे नगराध्यक्षांचे आश्वासन


कन्हान : - “स्वच्छ व प्रदूषणमुक्त कन्हान शहर” या उद्देशाने ज्येष्ठ नागरिक संघ, जागृती ज्येष्ठ नागरिक संघटना आणि कन्हान - पिपरी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील ग्रीन जिम परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.


बुधवार (दि.७) ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता स्वच्छता मोहीम २०२६ अंतर्गत ग्रीन जिम परिसराची साफसफाई करण्यात आली. या मोहिमेत ज्येष्ठ नागरिकांसह नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी, पदाधिकारी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील संपूर्ण ग्रीन जिमची दुरुस्ती करून त्याचे आधुनिकीकरण करण्याचे आश्वासन दिले. या सकारात्मक भूमिकेबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नगराध्यक्षांचे आभार व्यक्त करण्यात आले.


स्वच्छता मोहिमेत नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी, स्वच्छता समन्वयक मयुर डफरे, ज्येष्ठ नागरिक संघ कन्हान चे उपाध्यक्ष नारायण गजभिये, किशोर अरोरा, बालाजी नायर, छगन वानखेडे, तेजपाल वाघमारे, रमाकांत नागपुरे, सुशील कळमकर, पत्रकार मोहम्मद शफीक शेख, प्रभु बावनकर, सोनवणे तसेच जागृती ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष बाब्रुवान घोडमारे, उपाध्यक्ष भगवान लांजेवार, सचिव संजय करंडे, सहसचिव विठ्ठलराव मानकर, कोषाध्यक्ष विठ्ठलराव बोरकर, सदस्य ताराचंद निंबाळकर, रमेश चव्हाण, दामोधर बंड, मधुकर कुंभलकर, प्रभाकर रूंघे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


यावेळी नगरसेविका सौ. रेखा टोहणे यांनीही स्वच्छता मोहिमेत सहभागी होत आपला सहभाग नोंदविला.

कन्हान शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी अशा स्वच्छता मोहिमा सातत्याने राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. नगराध्यक्ष, नगरसेविका तसेच ज्येष्ठ नागरिकांनी स्वच्छता मोहीम सातत्याने सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रकाश नाईक यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून आभार मानले.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या