कन्हानमध्ये जखमी राष्ट्रीय पक्षी मोराला जीवदान
नगरसेवक समशेर पुरवले यांच्या पुढाकाराने वन विभागाकडे सुपूर्द
लक्ष्मी-विष्णू नगर परिसरातील प्रसंग ; उपचारासाठी नागपूरला रवाना
कन्हान : - कन्हान शहरातील प्रभाग क्र.३ अंतर्गत लक्ष्मी-विष्णू नगर परिसरात गुरुवारी (दि. २३ जुलै) सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास जखमी अवस्थेत राष्ट्रीय पक्षी मोर आढळून आला. जखमी मोरावर काही भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने त्याचा जीव धोक्यात आला होता. मात्र, नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि नगरसेवक समशेर पुरवले यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे मोराचे प्राण वाचविण्यात यश आले.
Injured national bird (peacock) saved in Kanhan.
समीर कालीचरण पुरवले यांनी जखमी मोरावर कुत्रे हल्ला करत असल्याचे पाहताच धाडसाने त्याची सुटका केली. त्यानंतर त्यांनी त्वरित नगरसेवक समशेर पुरवले यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच समशेर पुरवले यांनी घटनास्थळी धाव घेत वन विभागाशी संपर्क साधून मदत मागवली.
वन विभागाचे राऊंड ऑफिसर निलेश चव्हाण व त्यांच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळी पोहोचून जखमी मोराला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासणीनंतर पुढील उपचारासाठी मोराला नागपूर येथे वन विभागाच्या रेस्क्यू टीममार्फत रवाना करण्यात आले.
या वेळी विनोद पात्रे, शेखर बोरकर तसेच लक्ष्मी-विष्णू नगर परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. राष्ट्रीय पक्ष्याचे प्राण वाचविण्यासाठी नागरिकांनी दाखविलेली तत्परता आणि वन विभागाच्या त्वरित प्रतिसादाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
सह संपादक - ऋषभ बावनकर

Responsive Advertisement
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time