बोरडा (गणेशी) येथे ई-लायब्ररीचे उद्घाटन उत्साहात
कन्हान : - बोरडा (गणेशी) ग्रामपंचायत येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उभारण्यात आलेल्या ई - लायब्ररीचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या उपक्रमाचा गावातील विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातुन उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन सरपंच रेखाताई डुडरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. रेखाताई बेनीरामजी डुडरे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करून विद्यार्थ्यांच्या हस्ते फीत कापुन ई-लायब्ररीचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपसरपंच नरेंद्र ठाकरे, सदस्य रामराव बंड, सदस्या संगीता टेकाम यांच्यासह ग्राम पंचायतीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी ई - लायब्ररीचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञाना च्या सहाय्याने अभ्यास करावा व स्पर्धा परीक्षांसह विविध क्षेत्रांत यश संपादन करावे, असे ही सरपंचांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
कार्यक्रमाला गावातील जेष्ट मंडळी, नागरिक, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ग्रामपंचायत सचिव मेहर व ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सह संपादक - ऋषभ बावनकर

Responsive Advertisement
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time