शांतता व सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
कन्हान : - कन्हान शहरातील शिवाजी नगर येथे दारु पिऊन
शांतता व सुव्यवस्थेचा भंग करणारऱ्या आरोपी विरुद्ध कन्हान पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे .
शुक्रवार (दि.८) ऑगस्ट रात्री रोजी कन्हान पोलीसांना फोन द्वारे माहिती मिळाली कि , शिवाजी नगर कन्हान येथे नितेश सहारे नावाचा तरुण दारू पिऊन शिविगाळ करून गैरवर्तनुक करून शांतता व सुव्यवस्थेचा भंग करित आहे . पोलीस निरिक्षक सुनिल कामडी स्टापसह घटनास्थळी पोहोचले असता तरुण शिविगाळ करित धुमधाम करतांना मिळुन आला.
पोलीसांनी नितेश धनराज सहारे (२९) रा. शिवाजी नगर, कन्हान यास ताब्यात घेऊन प्राथमिक आरोग्य केन्द्र कन्हान येथे नेऊन तपासणी केली असता दारुचे सेवन केल्याचा अहवाल प्राप्त झाला . सार्वजनिक ठिकाणी शिविगाळ करून गैरवर्तणुक करून शांतता व सुव्यवस्थेचा भंग करतांना मिळुन आल्याने पोलीसांनी आरोपी नितेश सहारे याचा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

Responsive Advertisement
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time