बॅटऱ्या घेऊन जाणारा रिक्षाचालका विरुद्ध गुन्हा दाखल
बॅटऱ्या आणि आॅटो वाहन जप्त , कन्हान पोलीसांची कारवाई
कन्हान : - कांद्री येथील श्याम हार्डवेअर जवळ एक संशयीत इसम हा एॅप्पो लोडींग ऑटो मध्ये बॅटऱ्या घेऊन जात असतांना मिळुन आल्याने पोलीसांनी ऑटो चालकास ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन बॅटऱ्या आणि वाहन जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे .
पोलीसांन कडुन मिळालेल्या माहिती नुसार शुक्रवार (दि.२६) एप्रिल ला रात्री ९ वाजता ते शनिवार (दि.२७) एप्रिल ला पहाटे रात्री २ वाजता च्या दरम्यान पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार सुर्यभान जळते , महेश बिसेन , निखिल मिश्रा , सुनिल तेलंगे , दिपक कश्यप , आशिष बोरकर सह आदि पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करीत असतांना कांद्री येथील श्याम हार्डवेअर जवळ एक संशयीत इसम हा कथ्या रंगाचा ऍप्पे लोडींग ऑटो क्रमांक एम एच ४९ बीएम १३६८ सोबत संशयास्पद स्थितीत दिसुन आला . पोलीसांनी त्याचा जवळ जाऊन त्याचे नाव, गाव, विचारले त्याने आपले नाव मनीश दशरथ निनावे (वय २४) वर्ष रा.नागपूर असे सांगीतल्याने पोलीसांनी त्याच्या रिक्षाची झडती घेतली . वाहनाच्या कॅबीन मध्ये एक एमराॅन कंपनी ची बॅटरी चादरीने झाकलेल्या अवस्थेत दिसुन आली व त्याचा शेजारी बँटी खोलन्याकरीता लागनारी पाने मिळुन आले . पोलीसांनी आरोपी मनिष ला बॅटरीबाबत विचारपुस केली असता उडवा उडवीचे उत्तरे देत असल्याने पोलीसांना संक्षय येऊन आरोपी मनिष ला ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन रिक्षा वाहन , बॅटरी , पाने जप्त करुन सहायक फौजदार सुर्यभान जळते यांचा तक्रारी वरून आरोपी मनिष निनावे याचा विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .
सदरची कार्यवाही कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात सहायक फौजदार सुर्यभान जळते , महेश बिसेन , निखिल मिश्रा, सुनिल तेलंगे , दिपक कश्यप , आशिष बोरकर सह आदि पोलीस कर्मचारी यांनी केली .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

Responsive Advertisement
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time