अवैध वाळु वाहतुक करणारा टिप्पर ट्रकवर कन्हान पोलीसांची कारवाई
आरोपी पसार , वीस लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड येथे वाघधरे वाडी पुलाच्या खाली अवैध वाळु वाहतुक करणारा दहा चाकी टिप्पर ट्रक ला कन्हान पोलीसांनी पकडुन वीस लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
पोलीसांन कडुन मिळालेल्या माहिती नुसार सोमवार (दि.२०) एप्रिल ला दुपार च्या दरम्यान पोलीस निरिक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात सतिश फुटाने , आशिक कुंभरे , कोमल खैरे , निखिल मिश्रा , दिपक कश्यप सह आदि पोलीस कर्मचारी परिसरात खाजगी वाहनाने मौजा सिहोरा शिवारात पेट्रोलिंग करित असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि दहा चक्का टिप्पर ट्रक क्रमांक एम एच ४९ एटी १८१७ हा निलज खंडाळा मार्गे नागपुर कडे अवैध रित्या विनापरवाना वाळुची टिप्पर ट्रक मध्ये लोड करून वाहतुक करीत आहे .
अशा मिळालेल्या माहिती वरुन पोलीसांनी तारसा रोड येथे वाघधरे वाडी पुलाचा खाली नाकाबंदी करून दहा चक्का टिप्पर ट्रक क्रमांक एम एच ४९ एटी १८१७ दिसुन आला .
त्याला थांबण्याचा इशारा केला असता टिप्पर ट्रक हा दुर अंतरावर जाऊन थांबल्याने ट्रक चालकास विचारपुस केली असता ट्रक मध्ये वाळु असल्याचे सांगीतले . रेती बाबत रॉयल्टी व कागदपत्राबाबत विचारणा केली असता रॉयल्टी नसल्याचे सांगुन वेळ पाहुन ट्रक चालक घटनास्थळा वरुन पळुन गेला .
पोलीसांनी टिप्पर ट्रक ची पाहणी केली अवैध वाळुचा साठा मोठ्या प्रमाणात दिसुन आल्याने पोलीसांनी दहा चक्का टिप्पर ट्रक क्रमांक एम एच ४९ एटी १८१७ किंमत २०,०००,०० रु. व ६ ब्रास वाळु प्रत्येक ६,००० रु. प्रमाणे ३६,००० रु. असा एकुण २०,३६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सरकार तर्फे फिर्यादी निखिल उद्यशंकर मिश्रा यांचा तक्रारी वरून दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात पोलीस हवालदार सतीश फुटाणे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

Responsive Advertisement
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time