कन्हान शहरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा | Prime Minister Narendra Modi's campaign meeting in Kanhan city today |


कन्हान शहरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा | Prime Minister Narendra Modi's campaign meeting in Kanhan city today

चुनावा च्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी काढला रूट मार्च

कन्हान शहराचे छावणीत रूपांतर , वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कडेकोड बंदोबस्त

कन्हान :- रामटेक लोकसभा मतदार संघात १९ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांचा प्रचारार्थ आज कन्हान येथील ग्रोमर व्हेंचर्स च्या मैदानावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा होणार आहे .

पंतप्रधानांची सभा आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पोलीसांनी शहरात रूट मार्च काढला . कन्हान शहरात होणाऱ्या पंतप्रधानांच्या सभेसाठी पोलीस विभागाने सुरक्षेची पुर्णपणे तयारी केली आहे . सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केल्याने संपूर्ण कन्हान शहराला छावणीचे स्वरूप आले आहे . विशेष म्हणजे शहरातील प्रत्येक चौकात आणि सभा स्थळा च्या आजू बाजूच्या ठिकाणी पोलीसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



सुरक्षतेच्या दृष्टीकोणातुन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी काही नियम लागू केले आहेत . सभेच्या दरम्यान सभास्थळा पासून काही अंतरावर असलेल्या घरांच्या छतावर कोणालाही उभे राहण्यास मनाई करण्यात आली आहे. 

सभेच्या ठिकाणाहून कन्हान च्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर सुमारे तीन किलोमीटर अगोदरच बाहेर गावातून येणाऱ्या नागरिकांसाठी वाहने उतरवून पायीच सभेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केले आहे.


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या