कामठीत भरदिवसा महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावुन आरोपी पसार
पोलीसांत गुन्हा दाखल , घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
कन्हान/कामठी : - जुनी कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माजी नगरसेवक यांच्या संपर्क कार्यालया जवळ भरदिवसा मोलमजुरी करून घरी परत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात आरोपीने सोन्याची चैन हिसकावून पळुन नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळखळ उडाली आहे .
पोलीसांन कडुन मिळालेल्या माहिती नुसार रविवार (दि.२१) ला सायंकाळ च्या दरम्यान महिला नामे रेखा भारत बोरकर रा. हमालपुरा ही मोलमजुरी करून पायदळ घरी जात होती .
घराच्या अगदी जवळ आली असतांना पाठलाग करीत असलेल्या दोन अज्ञात आरोपींनी आपली दुचाकी वाहन महिले जवळ थांबविली व पत्ता विचारण्याचा बहाणा करीत संधी साधून तिच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळ काढला . महिलेने आरडाओरड केली असता माजी नगरसेवक कपिल गायधने तसेच शेजारी मंडळींनी मदतीची धाव घेतली मात्र तो पर्यंत आरोपी पळुन गेले होते .
सदर घटनेची माहिती जुने कामठी पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करून महिलेच्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांचा मार्गदर्शनात कामठी पोलीस करीत असुन सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेत आहे .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

Responsive Advertisement
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time