घरातुन रोख रक्कम व सोन्याची अंगुठी सह १ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमालाची चोरी


घरातुन रोख रक्कम व सोन्याची अंगुठी सह १ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमालाची चोरी


पोलीसात गुन्हा दाखल , शहरात आणि ग्रामीण भागात घरफोडी , चोरीचे गुन्हे वाढले 


कन्हान : - कन्हान शहरात आणि ग्रामीण भागात दिवसेन दिवस घरफोडी , चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढल्याने कन्हान पोलीसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्न निर्माण झाले असुन नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .


कन्हान शहरातील स्वामी विवेकानंद नगर येथुन बंद घरातुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी  नगदी व सोन्याची अंगुठी सह १ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमालाची घरफोडी केल्याने पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


प्राप्त झालेल्या माहिती नुसार गुरवार (दि.१८) एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता च्या दरम्यान इमरान वहीद शेख (वय २७) रा.कन्हान हे आपल्या काकाच्या लग्नाला परिवारा सोबत अमरावती येथे गेले होते . दुकानात काम करणारा नौकर याने इमरान च्या आईला फोन करुन सांगितले कि घराचा दरवज्याचा ताला तुटुन खाली पडला आहे . 

अश्या माहिती वरुन इमरान आणि त्याचे आई , वडील घरी आले . तेव्हा त्यांना दरवाज्याचा लाॅक तुटलेला दिसला . आता मध्ये जाऊन पाहणी केली असता मधल्या रुम मध्ये असलेली लोखंडी गोदरेज ची आलमारी उघडी दिसली व त्या मध्ये ठेवलेले नगदी १,६५,००० रु. व सोन्याची अंगुठी ५ ग्राम किंमत ३०,००० रु. असा एकुण १,९५,००० रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी इमरान शेख यांचा तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्रमांक २८७/२४ कलम ३८०,४५४,४५७ भांदवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड , पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हान , महेश बिसेन हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या