शेतात घर बांधकामासाठी ठेवलेला सळाखी लोहा चोरी
कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत निलज (खंडाळा) येथील हरबा शेंडे यांचा शेतात ठेवलेला सळाखी लोहा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
रमेश वामणराव धुगरे (वय ६०) रा.नागपुर यांचा कडे सव्वा चार एकर शेती आहे . रमेश यांनी निलज (खंडाळा) येथे घराचे काम सुरु करण्यासाठी त्यांचा बाजुचे शेत मालक हरबा सीताराम शेंडे यांच्या शेतात १ टन लोहा सळाखी ठेवल्या होत्या . गुरुवार (दि.२५) एप्रिल ला दुपारी ११ वाजता च्या दरम्यान रमेश सळाखी लोहा पाहण्यासाठी शेतात गेले व शेतातुन सायंकाळी ७:३० वाजता आपल्या घरी नागपुर ला निघुन गेले .
दुसऱ्या दिवशी शुक्रवार (दि.२६) एप्रिल ला सकाळी ८ वाजता च्या दरम्यान रमेश यांच्या शेताच्या बाजुचे शेत मालक हरबा शेंडे हे शेतात गेले . त्यांना शेतात ठेवलेला १ टन सळाखी लोहा पैकी ७०० किलो लोहा किंमत अंदाजे ४२,००० रुपयांचा मुद्देमाल दिसुन आला नाही . हरबा शेंडे यांनी रमेश यांना फोन द्वारे घटनेची माहिती दिली . कन्हान पोलीसांनी रमेश धुगरे यांचा तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र.२९५/२४ कलम ३७९ भांदवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर


Responsive Advertisement
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time