कांद्री धन्यवाद गेट समोरुन दुचाकी चोरी , पोलीसात गुन्हा दाखल
कन्हान : - नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील कांद्री धन्यवाद गेट समोर उभी केलेली दुचाकी वाहन कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरुन नेल्याने पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
प्राप्त माहिती नुसार विक्की प्रकाश सहारे वय ३१ वर्ष रा. शिवाजी नगर कन्हान हा शनिवार (दि.२०) एप्रिल ला सकाळी ९.३० वाजता कांद्री येथे धन्यवाद गेटच्या समोर आरामशीन जवळ त्याचा ठेकेदाराच्या कामाच्या साईट वर विक्की हा कामावर गेला असता त्याने आपली काळ्या रंगाची दुचाकी वाहन सी बी शाईन दुचाकी क्र. एम एच सीआर ६८३४ धन्यवाद गेट समोर उभी केली होती . पण विक्की आपल्या वाहनाची चाबी काढायचा विसरल्याने विक्की काही वेळा नंतर वाहनाची चाबी आणण्याकरिता गेला असता त्याची दुचाकी वाहन उभ्या केलेल्या जागी दिसुन आले नाही.
सतत दोन तीन दिवस विक्की ने आपल्या वाहनाचा शोध घेतला तरी मिळुन न आल्याने कोणीतरी अज्ञात चोरट्यांने धन्यवाद गेट समोरुन दुचाकी वाहन क्र. एमएच ४० सीआर ६८३४ किंमत ५५,००० रुपये चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी विक्की सहारे यांचा तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र. २९२/२४ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित असुन दुचाकी व आरोपीचा शोध घेत आहे .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

Responsive Advertisement
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time