कन्हान नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू , पोलीसात गुन्हा दाखल

 

कन्हान नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू , पोलीसात गुन्हा दाखल


कन्हान/कामठी : - नवीन कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत रेल्वे पुलाखाली कन्हान नदीपात्रात अंदाजे २८ ते ३० वर्ष तरुणाचे प्रेत मिळुन आल्याने नवीन कामठी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे .


पोलीसांन कडुन मिळालेल्या  माहिती नुसार रेल्वे पुलाखाली  कन्हान नदी पात्रात २८ ते ३० वर्षीय आशिष पाटिल नावाच्या  तरुणाचे प्रेत संध्याकाळी मिळुन आले . नवीन कामठी पोलीसांना घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले होते . शवविच्छेदन अहवाला नंतर आशिषचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असे स्पष्ट झाले आहे . सदर प्रकरणा बाबत नवीन कामठी पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोर पोरे यांचा मार्गदर्शनात नवीन कामठी पोलीस करीत आहे .


संबंधित तरुणा विषयी माहिती प्राप्त करण्यात आली असुन नवीन कामठी पोलीसांनी नातेवाईकांना मृत्यूदेह स्वाधीन केले आहे .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या