विद्युत वाहिनीच्या तीन खांबाची तार व एक लोंखडी खांब चोरी


विद्युत वाहिनीच्या तीन खांबाची तार व एक लोंखडी खांब चोरी


कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत वाघधरे वाड़ी येथुन विद्युत वाहिनीच्या तीन खांबाचे तार व एक लोंखडी खांब कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार (दि.२४) एप्रिल ला सकाळी ६.३० ते ८.३० वाजता दरम्यान वाघधरे वाडी खंडेलवाल कंपनी मधुन जाणारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची लघुदाब विद्युत वाहिनी च्या तीन खांबावरील विद्युत तार व एक लोखंडी खांब किंमत ५०,४६० रूपय कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली .


सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी कांता विठ्ठल सिडाम (वय ३०) वरिष्ठ तंत्रज्ञ महाराष्ट्र 

राज्य वीज वितरण केंद्र कन्हान यांचा तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात हेड कांस्टेबल सतीश फुटाणे हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या