उघड्या नाल्यात पडून दिड वर्षाचा मुलगा जख्मी | One and a half year old boy injured after falling into open drain


उघड्या नाल्यात पडून दिड वर्षाचा मुलगा जख्मी

कन्हान : - कन्हान - पिपरी नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक ६ मधील राजकुमार बर्वे यांच्या घरासमोर उघड्या नाल्यात पडून दीड वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला . नगरपरिषद चा प्रभाग क्रमांक सहा मध्ये निवडून दिलेल्या नगरसेवकांनी प्रभागांमध्ये विकासात कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे व प्रशासनालाही हातात न घेता विकासात कामे न केल्याचा आरोप नागरीकांकडुन होत आहे . 

प्रभागात अशा अनेक समस्या असून अनेक ठिकाणी उघड्या नाल्या आहे . त्यामुळे नेहमी अशा घटना घडत असतात . उघड्या नाल्यामुळे मच्छरांचा हैदोस असून नाल्यांची साफसफाई व देखरेख नसल्याने घाणीच्या दुर्गंधीच्या समस्याला प्रभागातील लोकांना सहन करावा लागतात . 

त्यामुळे आरोग्यावर त्याच्या दुष्परिणाम दिसून येत आहे . साथीच्या रोगामध्ये अशा उघड्या नाल्यामुळे आणखीच भर पडते . पावसाळ्याच्या पाणी सांडपाणी तुटुंब भरल्याने रस्त्यावर येऊन पायी चालकांना त्रास सहन करावा लागतो . 

One and a half year old boy injured after falling into open drain

पण मात्र नगरसेवकांच्या कामचुकार पणामुळे नागरिकांना यम यातना भोगाव्या लागत आहे . यातच सामाजिक कार्यकर्ते संदीप शेंडे यांच्यासह परिसरातील अशा घटनांमुळे त्रस्त नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे प्रभाग ६ मधील सर्व उघड्या नाल्या झाकण्याची मागणी केली आहे .

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या